Posts

Showing posts from January, 2022

गुडूची

Image
  गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी॥८|| संग्राहिणी कषायोष्णा लघ्वी बल्याऽग्निदीपिनी | दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्॥९|| कामलाकुष्ठवा  तास्रज्वरक्रिमिवमीन्हरेत् | (प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत्)॥१०||             गुडूची (गुळवेल) ही एक वेल वर्गीय औषधी वनस्पती आहे. अमृता या नावाने देखील ती ओळखली जाते. मुळात, गुडूची ही रसायन कार्य करते. म्हणून तिला 'पृथ्वीवरील अमृत' असे म्हटले जाते. चवीने (रस) कडू - तिखट असते. तिचा विपाक मधुर असतो. बल वाढवणारी आणि अग्नी दिपन करणारी आहे. त्रिदोषांचा (कफ, पित्त, वात) नाश करणारी असून दाह कमी करणारी, तृष्णा कमी करणारी आहे. प्रमेह, कास(खोकला), पांडू(Anemia), कामला(jaundice-काविळ), कुष्ठ(त्वचाविकार), वातविकार, ज्वर(ताप), कृमी या व्याधींचा नाश करून अमृतासारखे कार्य करणारी 'गुडूची' आहे.   प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी : प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे.  प्रतिकारशक्ती  वाढविण्यास  आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार ...