गुडूची

 



गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी॥८||
संग्राहिणी कषायोष्णा लघ्वी बल्याऽग्निदीपिनी |
दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्॥९||
कामलाकुष्ठवा तास्रज्वरक्रिमिवमीन्हरेत् |
(प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत्)॥१०||

            गुडूची (गुळवेल) ही एक वेल वर्गीय औषधी वनस्पती आहे. अमृता या नावाने देखील ती ओळखली जाते. मुळात, गुडूची ही रसायन कार्य करते. म्हणून तिला 'पृथ्वीवरील अमृत' असे म्हटले जाते.

चवीने (रस) कडू - तिखट असते. तिचा विपाक मधुर असतो. बल वाढवणारी आणि अग्नी दिपन करणारी आहे. त्रिदोषांचा (कफ, पित्त, वात) नाश करणारी असून दाह कमी करणारी, तृष्णा कमी करणारी आहे. प्रमेह, कास(खोकला), पांडू(Anemia), कामला(jaundice-काविळ), कुष्ठ(त्वचाविकार), वातविकार, ज्वर(ताप), कृमी या व्याधींचा नाश करून अमृतासारखे कार्य करणारी 'गुडूची' आहे.

 प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी :

प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यास आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. 

ताप कमी करण्यासाठी : गुळवेलाचा काढा ताप कमी करण्यासाठी घेऊ शकता.

डेंग्युवरही लाभदायक :

गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते. याचे निमयित सेवन तुम्हाला डेंग्यूचा ताप उतरवण्याठी मदत करते

अशी, बहुगुणी वनस्पती आणि तिचे फायदे अनेक आहेत पण,वापर नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.

आधिक माहिती साठी संपर्क : 

Shree Ayurvishwa Ayurveda,

Dr. Suyogita - 9421555687.

 

 

 

Comments

Post a Comment

Thank you

Popular posts from this blog

हरितकी

आवळा(आमलकी) - Indian Gooseberry