आहळीव
आळीव किंवा आहळीव असे याला
म्हणतात. याचे अनेक औषधी उपयोग आहेत. अळीवाच्या बिया आपल्या
आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. आकाराने छोट्या असलेल्या या बियांमध्ये फोलेट,
लोह, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन यासारख्या पोषक
तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जाणून घेऊया अळीवाच्या बियांचे फायदे…
चंद्रिका चर्महंती च
पशुमेहंकारिका।
नंदिनी
कारवी भद्रा वासपुष्पा सुवसरा।।
चंद्रशूरं
हितं हिक्कावात श्लेष्मतीसारिणम।
असृगवात
गदद्वेषी बालपुष्टी विवर्धनम।।
मासिक पाळीशी संबंधित समस्या
आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणे
अतिशय महत्त्वाचे असते. अळीवाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल हे घटक आहेत. नियमित
अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
अनियमित मासिक पाळीच्या समस्या देखील हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते.
स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी लाभदायक
यामध्ये प्रोटीन आणि लोहाची मात्रा देखील अधिक आहे. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी
अळीवाच्या बिया एखाद्या सुपरफूड प्रमाणे कार्य करतात. गॅलेक्टॅगॉगयुक्त
खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास स्तनातील दूध वाढण्यास मदत मिळते. अळीवाच्या
लाडूमध्ये बदाम आणि डिंकाचाही तुम्ही समावेश करू शकता.
अॅनिमियाची समस्या दूर
करण्यासाठी
लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे अळीवाच्या बिया. शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा
पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशी वाढण्यास मदत मिळते आणि हिमोग्लोबिनची पातळी देखील
सुधारते. याव्यतिरिक्त अळीवाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात
असते.
अळीवाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि फायबरची मात्रा असल्याने पोट दीर्घ काळापर्यंत भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या देखील कमी होते. प्रोटीनमुळे शरीराचे स्नायू सुद्धा मजबूत होतात. महत्त्वाचे म्हणजे शरीराचे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
# सतत
सारखी उचकी लागली असता आळीव उचकी ताबडतोब थांबविते. 20 ग्रॅम आळीव पाव लिटर पाण्यात भिजत घालावे व पाणी चांगले दाट
झाल्यावर, उचकी लागलेल्या माणसास वरचेवर पिण्यास द्यावे. याने उचकी थांबते.
हृदयरोगावर सुध्दा अळीव फायदेशीर आहेत
For
more Information & Home Remedies.........
Contact:
Dr. Suyogita : 9421555687
Informative and important thanks for giving us this information
ReplyDeleteInformative 👍
ReplyDeleteTo Useful
ReplyDelete