हरितकी

 

हरितकी

                                                                                     (हिरडा(म.), हरड (हीं).)

                                                                      


           'त्रिफळा चूर्ण' योगा मध्ये वापरले जाणारे द्रव्य. हरीतकी फक्त औषधासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. हरितकी या वनस्पतीचे फळ,मूळ आणि सालीचा उपयोग केला जातो.

          हरितकीलाच संस्कृत मध्ये 'विजया' हा पर्याय आहे. ज्याचा अर्थ सर्व रोगांवर विजय मिळवणारी वनस्पती. तसेच अभया,पथ्या, पुतना, अमृता, हेमवती, चेतकी, शिवा,श्रेयसी, इ. पर्यायी नावे आहेत.

 

हरितकी पञ्चरसालवणा तुवरा परम ।

रुक्षोष्णा दिपनी मेध्या स्वादूपाका रसायनी ।।

चक्षुष्या लघुरायुष्या बृ़ंहणी चानुलोमिनी ।

श्र्वास कास प्रमेहार्श:कुष्ठ शोथोदरक्रिमीन् ।।

 

            हरितकी लवणरहित (खारट) पाचही रसयुक्त आहे.रुक्ष,उष्ण, दिपनी म्हणजे भूक वाढवणारी आहे.  बुध्दी वर्धक आहे. मधुर विपाक आसल्यामुळे ती रसायना प्रमाणे कार्य करते. म्हणजेच आयुष्य वाढवते आणि वृध्दावस्था दूर ठेवते. डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे. तसेच, मधुमेह (diabetes),अर्श (मूळव्याध), आस्थमा, खोकला, कुष्ठ, शरीरावर आलेली सूज या रोगांना दूर करणारी आहे.

कावीळ,अपचन,अजीर्ण,कृमिरोग, मुत्ररोग या रोगांमध्ये फायदा देणारी आहे.

अशी, बहुगुणी वनस्पती आणि तिचे फायदे अनेक आहेत पण,वापर नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.

           आधिक माहिती साठी संपर्क

              9421555687.

Comments

  1. Its fabulous.... Please givs some information आपण हे कोणत्या पद्धतीने खाऊ शकतो.

    ReplyDelete
    Replies
    1. 2 चमचे हरितकी चूर्ण मधासोबत, कोमट पाण्यातून घेऊ शकतो.
      पण, प्रत्येक रोगानुसार आणि ऋतूनुसार त्याचे अनुपान (कशासोबत घ्यायचे) ठरते.

      Delete
  2. Thankyou for such a good info👍

    ReplyDelete

Post a Comment

Thank you

Popular posts from this blog

गुडूची

आवळा(आमलकी) - Indian Gooseberry