आवळा(आमलकी) - Indian Gooseberry
आवळा(आमलकी)
आयुर्वेदिक औषधांनुसार,
आमलकी(आवळा) विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी
उपयुक्त आहे. यकृत, हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांचे निरोगी कार्य सुधारते. त्रिफळा चूर्ण या कल्पाचा एक महत्त्वाचा घटक 'आवळा' आहे.
आवळ्याचा उपयोग विविध प्रकारे करता येतो,
Juice, Powder, आवळ्याचे लोणचे, ई. आवळ्यामध्ये भरपूर मात्रेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स
आणि न्यूट्रीइंट्स असतात.
Scientific नाव
- phyllanthus emblica L.
आवळ्यामध्ये लवण(खारट)
सोडून बाकी पंच रस (मधुर,आम्ल,कटू-तिखट, तिक्त-कडू, कषाय- तुरट) असतात.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
वयस्यामलकी वृष्या
जातीफलरसं शिवम् |
धात्रीफलं श्रीफलं
च तथामृतफलं स्मृतम्
|
त्रिष्वामलकमाख्यातं धात्री
तिष्यफलाऽमृता ||३८||
हरीतकीसमं धात्रीफलं किन्तु
विशेषतः |
रक्तपित्तप्रमेहघ्नं परं
वृष्यं रसायनम् ||३९||
हन्ति
वातं तदम्लत्वात्पित्तंमाधुर्यशैत्यतः |
कफं
रूक्षकषायत्वात्फलंधात्र्यास्त्रिदोषजित् ||४०||
यस्य
यस्य फलस्येह वीर्यं
भवति यादृशम् |
तस्य
तस्यैव वीर्येण मज्जानमपि निर्दिशेत्||४१||
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आवळ्याचे फायदे/गुणधर्म:
1. आवळा हे एक best anti-aging (वयस्थापन) फळ आहे.
2. चक्षुष्य:
आवळा डोळ्याचे आरोग्य वाढवतो.
3. रक्तपित्तघ्न: आवळा हे विविध रक्तस्त्राव विकारांवर काम करते.(bleeding
disorders)
4. प्रमेहघ्न
-एक उत्तम Anti Dibetic आहे.
5. व्हायरल, फंगल आणि बॅक्टरीअल
infection मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
मलावष्टंभ
किंवा पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर 3 ते 6 gm आवळा
चूर्ण गरम पाण्यातून घ्यावे.
Hyperacidity
किंवा पित्ताच्या तक्रारिवर आवळा खूप छान काम करतो.

Comments
Post a Comment
Thank you