आळीव किंवा आहळीव असे याला म्हणतात. याचे अनेक औषधी उपयोग आहेत. अळीवाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. आकाराने छोट्या असलेल्या या बियांमध्ये फोलेट, लोह, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन यासारख्या पोषक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जाणून घेऊया अळीवाच्या बियांचे फायदे… चंद्रिका चर्महंती च पशुमेहंकारिका। नंदिनी कारवी भद्रा वासपुष्पा सुवसरा।। चंद्रशूरं हितं हिक्कावात श्लेष्मतीसारिणम। असृगवात गदद्वेषी बालपुष्टी विवर्धनम।। मासिक पाळीशी संबंधित समस्या आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणे अतिशय महत्त्वाचे असते. अळीवाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल हे घटक आहेत. नियमित अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. अनियमित मासिक पाळीच्या समस्या देखील हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी लाभदायक ...