सुंठीचे फायदे
👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉
शुण्ठी विश्वा च विश्वञ्च नागरंविश्वभेषजम् |
ऊषणं कटुभद्रञ्च शृङ्गवेरं महौषधम् ||४४||
शुण्ठी रुच्यामवातघ्नी पाचनी कटुका लघुः |
स्निग्धोष्णा मधुरा पाके कफवातविबन्धनुत् ||४५||
वृष्या स्वर्या वमिश्वासशूलकासहृदामयान् |
हन्ति श्लीपदशोथार्श आनाहोदरमारुतान् ||४६||
आग्नेयगुणभूयिष्ठं तोयांशपरिशोषि यत् |
संगृह्णाति मलं तत्तु ग्राहि शुण्ठ्यादयोयथा ||४७||
विबन्धभेदिनी या तु सा कथं ग्राहिणी भवेत् |
शक्तिर्विबन्धभेदे स्याद्यतो न मलपातनो ||४८||
आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते. सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे.
भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते. 'कावीळ' या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते.
ताकात सुंठेचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.
सुंठ आणि वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने कृमी नष्ट होतात.
For more Information & Home Remedies.........
Contact: Dr. Suyogita : 9421555687

Helpful information
ReplyDeleteChan mahiti
ReplyDeleteThis is a helpful information for our daily life .
Delete