Posts

गुडूची

Image
  गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी॥८|| संग्राहिणी कषायोष्णा लघ्वी बल्याऽग्निदीपिनी | दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्॥९|| कामलाकुष्ठवा  तास्रज्वरक्रिमिवमीन्हरेत् | (प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत्)॥१०||             गुडूची (गुळवेल) ही एक वेल वर्गीय औषधी वनस्पती आहे. अमृता या नावाने देखील ती ओळखली जाते. मुळात, गुडूची ही रसायन कार्य करते. म्हणून तिला 'पृथ्वीवरील अमृत' असे म्हटले जाते. चवीने (रस) कडू - तिखट असते. तिचा विपाक मधुर असतो. बल वाढवणारी आणि अग्नी दिपन करणारी आहे. त्रिदोषांचा (कफ, पित्त, वात) नाश करणारी असून दाह कमी करणारी, तृष्णा कमी करणारी आहे. प्रमेह, कास(खोकला), पांडू(Anemia), कामला(jaundice-काविळ), कुष्ठ(त्वचाविकार), वातविकार, ज्वर(ताप), कृमी या व्याधींचा नाश करून अमृतासारखे कार्य करणारी 'गुडूची' आहे.   प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी : प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे.  प्रतिकारशक्ती  वाढविण्यास  आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार ...

हरितकी

Image
  हरितकी                                                                                      (हिरडा(म.), हरड (हीं).)                                                                                   'त्रिफळा चूर्ण' योगा मध्ये वापरले जाणारे द्रव्य. हरीतकी फक्त औषधासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. हरितकी या ...

आहळीव

Image
आळीव किंवा  आहळीव असे याला म्हणतात. याचे अनेक औषधी उपयोग आहेत.  अळीवाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. आकाराने छोट्या असलेल्या या बियांमध्ये फोलेट, लोह, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन यासारख्या पोषक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जाणून घेऊया अळीवाच्या बियांचे फायदे… चंद्रिका चर्महंती च पशुमेहंकारिका। नंदिनी कारवी भद्रा वासपुष्पा सुवसरा।। चंद्रशूरं हितं हिक्कावात श्लेष्मतीसारिणम। असृगवात गदद्वेषी बालपुष्टी विवर्धनम।। मासिक पाळीशी संबंधित समस्या                        आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणे अतिशय महत्त्वाचे असते. अळीवाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल हे घटक आहेत. नियमित अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. अनियमित मासिक पाळीच्या समस्या देखील हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी लाभदायक   ...

सुंठीचे फायदे

Image
  👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 👉👉👉 शुण्ठी विश्वा च विश्वञ्च नागरंविश्वभेषजम् | ऊषणं कटुभद्रञ्च शृङ्गवेरं महौषधम् ||४४|| शुण्ठी रुच्यामवातघ्नी पाचनी कटुका लघुः | स्निग्धोष्णा मधुरा पाके कफवातविबन्धनुत् ||४५|| वृष्या स्वर्या वमिश्वासशूलकासहृदामयान् | हन्ति श्लीपदशोथार्श आनाहोदरमारुतान् ||४६|| आग्नेयगुणभूयिष्ठं तोयांशपरिशोषि यत् | संगृह्णाति मलं तत्तु ग्राहि शुण्ठ्यादयोयथा ||४७|| विबन्धभेदिनी या तु सा कथं ग्राहिणी भवेत् | शक्तिर्विबन्धभेदे स्याद्यतो न मलपातनो ||४८|| आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते. सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार...